
श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्साहात साजरी
नांदुरा तालुका प्रतिनिधी: (संदेश पहूरकर)
श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नांदुरा येथे शिक्षक दिन तसेच दहीहंडी व गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोपाळांच्या वेशभूषेत सहभागी होत वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण केले. बालगोपालांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. गोपाळकाला प्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, संघभावना व सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत झाली. शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
