युवा कवी विशाल कुलट‌ साहित्य क्षेत्रातील “युवा रत्न” पुरस्काराने सन्मानित

युवा कवी विशाल कुलट‌ साहित्य क्षेत्रातील “युवा रत्न” पुरस्काराने सन्मानित

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

प्रतिभा साहित्य संघाचे अकोट तालुकाध्यक्ष तथा युवा कवी विशाल कुलट‌ याला लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान कोल्हापूर तर्फे दिला जाणारा २०२६ चा साहित्य क्षेत्रातील “युवा रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,मेडल व पुस्तके असे होते.भव्य पुरस्कार वितरण सोहळा श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली पूर्व जि.ठाणे येथे प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश पाटील, ज्येष्ठ कवी,लेखक, पत्रकार बाळासाहेब तोरस्कर, अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे, सीता ट्रस्टचे फाऊडंर शंकर अंदानी व इतर मान्यवरांच्या हस्ते विशाल कुलट यांना “युवा रत्न २०२६” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली कवी विशाल कुलट‌ यांची जडणघडण होत आली.प्रतिभा साहित्य संघाच्या मार्गदर्शनामुळे, शिकवणीमुळे या साहित्य क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. शेतीमाती, शेतकरी, कष्टकरी व वास्तव जीवनशैलीवर तसेच प्रेम रूपाचे भाव विशाल कुलट यांच्या कवितेत उमटतात.सातत्यपूर्ण लिखाण,ताकदीचे सादरीकरण व संवेदनशील जाण घेऊन विशाल कुलट यांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल चालू आहे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *