
सेंट पॉल ॲकॅडमी द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ, अकोला रोड, अकोट येथे कृष्णा जन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
सेंट पॉल ॲकॅडमी द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ, अकोला रोड, अकोट येथे दि. ५ सप्टेंबर रोजी कृष्णाष्टमी मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया होते.यावेळी उपाध्यक्ष लूणकरण डागा,सचिव प्रमोद चांडक,रेखा चांडक,शारदा लखोटिया,सुधा डागा,दीपम लखोटिया,अवनी लखोटिया,नानासाहेब हिंगणकर, मोहता सर,भरत पेठे सर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर पातोंड, बचपन प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका कोमल मन्नी मॅडम, ज्यु. कॉलेजच्या इनचार्ज निलिमा देशमुख मॅडम इन चार्ज विशाल चांदूरकर यांची मंचावर उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करून कृष्ण भगवानची आरती करण्यात आली.कार्यक्रमात इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.मुली सुंदर राधाच्या वेशभूषेत तर मुले कृष्णाच्या वेशभूषेत आले होते.’बेस्ट राधा कोण?बेस्ट कृष्ण कोण?अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी तीन बेस्ट राधा व बेस्ट कृष्ण यांना पारितोषिक देण्यात आले.त्यासाठी मार्गदर्शक म्हणून सुमती वानखडे मॅडम व निशा हेड मॅडम यांनी काम पाहिले.तसेच विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या गीतावर नृत्याचे सादरीकरण केले.मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात गोपाळकाल्याचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे यशस्वी संचालन स्वराज मार्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन इयत्ता 5वी ची विद्यार्थिनी मुक्ताबाई मंगळे हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी दहीहांडी फोडण्यात आली.विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून काल्याच्या प्रसादाचा आनंदाने आस्वाद घेतला.
.
