
लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ, ज्युनियर कॉलेज व बचपन प्ले स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ येथे दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनीत लखोटिया होते.यावेळी उपाध्यक्ष लूणकरन डागा, सुधा डागा, सचिव प्रमोद चांडक, रेखा चांडक, शारदा लखोटिया, अवनी लखोटिया, नानासाहेब हिंगणकर, पेठे सर, मोहता सर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर पातोंड, बचपन प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका कोमल मन्नी मॅडम, ज्यु.कॉ.च्या निलिमा देशमुख मॅडम, इनचार्ज विशाल चांदूरकर सर यांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या जीवनावर आधारित गीतावर नृत्य सादर केले.सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात शाळेच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व सांगितले.अवनी मॅडम यांनी AI ची आधुनिक व शिक्षण क्षेत्रात सांगड कशी घालायची ते सांगितले. चांडक सरांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.निलिमा मॅडम, मन्नी मॅडम यांनी सुद्धा आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या संचालनाची सुंदर मांडणी महेश शर्मा सरांनी केली. सर्व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक म्हणून त्यांना शिक्षक दिनानिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या.मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून सर्व शिक्षकांच्या कार्याची स्तुती करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.
