सेंट लपॉल्स अकॅडमी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी

सेंट लपॉल्स अकॅडमी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे जन्माष्टमी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनित लखोटीया,उपाध्यक्ष लुणकरण डागा व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव प्रमोद चांडक,रेखा चांडक,तसेच शारदा लखोटिया,सुधा डागा,दीपम लखोटिया,अवनी लखोटिया,तसेच पालक प्रतिनिधी स्नेहल गीते व दीप्ती पुंडकर,शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे,उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी,रिंकू अग्रवाल,नितीन गावंडे,मालती महल्ले,सुचिता गायकवाड,वैशाली गावत्रे,प्रभुदास नाथे यांची मंचावर उपस्थिती लाभली.सर्वप्रथम कार्यक्रमामध्ये प्रतिमेचे आणि श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर केजी २ मधल्या विद्याथीनीचे स्वागत गीत सादर केले.त्यांना साथ अर्चना रायबोले व योगेश चेडे यांनी दिली. इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी कृष्णजन्माष्टमी वर आधारीत नाटिका सादर केली.या कार्यक्रमात नर्सरी ते केजी २ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी कृष्णाची व राधाची वेशभूषा केली होती.जन्माष्टमीनिमित्त वर्ग के.जी.१ च्या विद्यार्थ्यांनीश्रीकृष्ण जन्मोत्सव वर नृत्य सादर केले तर नर्सरी व केजी २ च्या विद्यार्थ्यांनी नृत्य स्वरूपात कृष्णलीला सादर केली.शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे सर यांनी श्रीकृष्णा च्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगून नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.वर्ग ४ ते च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सांगता दहीहंडी फोडून केली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमोद चांडक यांनी कार्यक्रमाच्या शेवटी जन्माष्टमीनिमित्त करून चिमुकल्या राधा कृष्णाचे तसेच पालकांच्या सहकार्याचे भरभरून कौतुक करून शिक्षकांना प्रोत्साहित करणारे वक्तव्य केले.कार्यक्रमाचे संचालन शुभांगी वाकडे सोबत वर्ग ३ री मधून वल्लारी पिसे व दक्ष वाघोडे तर आभार प्रदर्शन सोनू पाथरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *