
नांदुरा तहसील कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य; बाथरूममधून दुर्गंधी, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी
नांदुरा तालुका प्रतिनिधी :- (संदेश पहुरकर)
नांदुरा येथील तहसील कार्यालय परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाल्याची नागरिकांकडून तक्रार होत आहे. विशेषतः कार्यालयातील बाथरूम व मुतारी परिसरात अस्वच्छता असून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.तहसील कार्यालय हे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असलेले महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहे. मात्र स्वच्छतेकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बाथरूम व मुतारीची नियमित स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.तहसीलदार साहेबांनी स्वतः याकडे लक्ष घालून तहसील कार्यालयातील स्वच्छता व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
