
भूमी फाउंडेशनच्या गरबा महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!भक्तिमय वातावरणात नवव्या वर्षाचा उत्सव; विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसह चांदीच्या प्रतिमांची भेट, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
आकोट शहर प्रतिनिधी भरतराज मर्दाने
नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक परंपरा जपत महिलांना एकत्र आणणे, स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे, या उद्देशाने भूमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य गरबा महोत्सव नुकताच येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या या महोत्सवात भक्ती, संस्कृती, उत्साह आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. गरबा महोत्सवात विविध गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रुप, उत्कृष्ट जोडी आणि उत्कृष्ट गरबा खेळाडू अशा विविध श्रेणींमध्ये स्पर्धकांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध नृत्य आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.*विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण* गरबा स्पर्धेतील विजेत्यांना दास मोबाईलच्या वतीने विविध आकर्षक बक्षिसे तसेच चांदीच्या प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले. अनया मोरे, अनुष्का वर्मा, नवदुर्गा ग्रुप, डोडिया ग्रुप, आदिशक्ती ग्रुप, चोखलिया ग्रुप, प्रेरणा मोरे आणि अलका टावरी यांच्यासह विविध स्पर्धक व समूहांनी वेगवेगळ्या गटांत विजेतेपद पटकावले. विजेत्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले.*विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती*या महोत्सवाला शिवसेना (शिंदे गटाचे) उपनेते गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोहनराव आसलकर, वास्तुशिल्पकार नवनीत सेठ लखोटिया, व्यापारी रितेश मिरझापूरे, सचिन भुस्कट, प्रमोद चांडक, अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकृष्ण गुट्टे, डॉ. दिनेश नागमते, छावा संघटनेचे शंकरराव वाकोडे, काँग्रेस नेते प्रशांत पाचडे, ब्युटीशियन सागर गवळी, ‘सत्याचा लढा’चे मुख्य संपादक सतीश बापू देशमुख, मंगेश चिखले, नगर परिषद सभापती नयना इंगोले, दीपक बोडखे, डॉ. विशाल इंगोले आणि मिलिंद नितोने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गरबा स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या स्मिता जीवानी, अविनाश अबुलकर आणि अनिकेत डोंगरदिवे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.*सामाजिक योगदान देणाऱ्यांचाही गौरव*भूमी फाउंडेशनच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये मंगला पितांबरवाले, रील्स् स्टार रेणुका सुरु, गायत्री पिपराळे, रुपेश इदौरे, आदित्य गोटवाल, अमोल पवार, जितेश गलाडे, सुमेध खडारे, स्मिता महल्ले, भावना रेवस्कर, सचिन वानखडे, प्रशांत बेराड, संदेश चौडेकर, शुभांगी बरेठिया, पूजा राठोड, अजय तेलगोटे, कीर्ती पितांबरवाले आणि गौतम मुळे यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया इंगोले यांनी केले, तर भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी उपस्थित मान्यवर, स्पर्धक, सहकारी आणि आयोजकांचे आभार मानले.
