
अज्ञात व्यक्तीने वणी वारुळा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ४ एकरातील सोयाबीनची गंजी पेटवून दिली
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुळा येथील शेतकरी महेश रामभाऊ मोहोकार यांच्या ४ एकर शेतातील सोयाबीन ची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवुन दिली.महेश मोहोकार यांनी आपल्या शेतातील सोयाबीन ची पेटलेली गंजी पाहून हृदय भरुन आले व ते खाली कोसळले असताना उपस्थीतांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर गंजी पेटवली असता त्या गंजी चा धुर व जाळ वारुळा परीसरात दिसत होता त्यामुळे गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली असता पाण्याच्या अभावामुळे आग विझवू शकले नाही.मात्र या बाबतीत संदीप काळे यांनी या घटनेची माहिती अकोट पोलिसांना दिली व त्यांच्या माहिती नुसार पोलीस व अकोट येथील अग्निशमन दलाच्या साहाय्याने गंजी विजविण्यात आली.सदर घटना ही सायंकाळी ७.३० वाजता च्या दरम्यान घडली असून अज्ञात व्यक्तीने आग ही सोयाबीन गंजी च्या चार ही बाजुने लावलेली होती.त्यामुळे आग एवढी भयानक होती की ती अग्निशमन दलाचे जवान यांनीच विझवून बाकी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.सदर घटनास्थळी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण चे बिट जमादार निलेश खंडारे व पो हे का शिवकुमार तोमर, पोका नितीन तेलगोटे,पोका सागर नागे, पोका अमोल म्हस्के,सह कृषी अधिकारी,व तलाठी यांनी जागेवर पंचनामा करून तसा अहवाल तहसीलदार अकोट यांना सादर करण्यात येणार असल्याचे समजते.
