NCMC स्मार्ट कार्ड सुविधा बनली प्रवाशांची डोकेदुखी!विद्यार्थ्यांनी, महिलाचे हाल

NCMC स्मार्ट कार्ड सुविधा बनली प्रवाशांची डोकेदुखी!विद्यार्थ्यांनी, महिलाचे हाल ; ST महामंडळाचा संताप जनक कारभारमहामंडळाची ही योजना पुर्वीप्रमानेच योग्य होती, उषा

जाधव वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,३:-शासनाच्या वतीने महिलांनसह , सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात असल्यातरी यामध्येच ST महामंडळाचा महीलांनकरीता, अर्ध टिकीट व ६५ वर्षाच्या पुरुषांसाठी अर्ध टिकीट व महिला आणि वयोवृद्ध ७५ वर्षाच्या वरच्या महिला व पुरुषांकरिता मोफत प्रवासाची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली असताना आता मात्र यांना एस टी ने प्रवास करण्यासाठी NSMC कार्डची सक्ती असलेने डोकेदुखी वाढली आहे, पहिल्या प्रमानेच आधार कार्ड वरचा प्रवास ठेवावा, अशी मागणी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या राज्य

मालेगांव एस टी बस स्थानक चे प्रभारी वाहतूक नियंत्रण चव्हाण साहेब यांना या सवलती बदल माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की शासनाच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ पासून नवीन नियमाप्रमाणे NCMC कार्डची सक्ती असल्याने याचे पालन सर्वांनी केलं पाहिजे, असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,

उपाध्यक्षा तथा मा जि प सदस्य उषा जाधव यांनी केली आहेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तांत्रिक बिघाड आणि नियोजनशून्य कारभारामुळे सध्या सामान्य प्रवासी, वयोवृद्ध, महिला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने प्रवाशांच्या NCMC स्मार्ट कार्ड सुविधा सुरू केली खरी, मात्र हेच स्मार्ट कार्ड आता प्रवाशांच्या डोकेदुखीचे मुख्य कारण ठरले आहे. स्मार्ट कार्डवर वेळेवर रिचार्ज करूनही बसमध्ये चढल्यानंतर वाहकांकडून (कंडक्टर) ‘सर्वर डाऊन आहे’ असे सांगण्यात येते. सर्वर चालत नसल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांना पूर्ण (फुल) तिकीट काढायला भाग पाडले जात आहे. ‘आम्ही दररोज प्रवासासाठी मोजकेच पैसे आणतो. घरची परिस्थिती हलाकीची असताना आणि कार्डवर आधीच रिचार्ज केलेला असताना, प्रत्येक वेळेस रोख रक्कमेतून फुल तिकीट कसे काढायचे? कार्ड असूनही आम्हाला दररोज आर्थिक फटका बसत आहे, यात आमची काय चूक?’ असा आक्रमक सवाल एका प्रवासी विद्यार्थिनीने उपस्थित केला आहे.ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या महिला आणि वयोवृद्ध आम्ही घरातून मोजकेच पैसे घेऊन निघतो. सरकारने महिलांसाठी हाफ तिकीट योजना जाहीर केली खरी, पण कार्ड असूनही आम्हाला पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत असेल, तर या सवलतीचा फायदा काय? खेडेगावातील गरीब जनतेची अशी फसवणूक करू नका.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *