
दुर्गा देवी विसर्जन उत्सवाच्या पार्श्वभुमीवर अकोट शहर पोलिस प्रशासन सज्ज चोख पोलिस बंदोबस्त व आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे निगराणी
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
दि.१९/१०/२०२६ रोजी अकोट शहरामध्ये होवु घातलेला दुर्गा देवी विसर्जन उत्सव शांततेत, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असुन विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.दुर्गा देवि विसर्जनाच्या पाश्वभुमीवर गर्दीचे व्यवस्थापन, वाहतुक नियमन, संवेदनसिल ठिकाणावरिल निगराणी तसेच संभाव्य अनुचित घटणाना प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असुन जिल्हयातुन तसेच अमरावती विभागातुन बंदोबस्त मागविण्यात आला आहे. सदर बंदोबस्तामध्ये पोलिस उपअधिक्षक दर्जाचे ०३ अधिकारी, १३ पोलिस निरिक्षक, ५७ सहायक पोलिस निरिक्षक/पोलिस उपनिरिक्षक, ९४६ पोलिस अंमलदार, १९५ होमगार्ड सैनिक तसेच आर.सि.पी व एस.आर.पि.एफ प्लॉटुन याचा समावेस आहे. मुख्य निवडणुक मार्ग, इतर निवडणुक मार्ग तसेच संवेदनसिल ठिकाणाची ड्रोन कॅमे-याव्दारे पाहणी करण्यात आली असुन मिरवणुकी दरम्यान एकुन ३० कॅमेरे व ड्रोन कॅमे-यासह परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अकोट शहर पोलिस प्रशासन सज्ज आहे.दुर्गादेवी विसर्जनाच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन अकोट शहर यांचे वतिने आज दि. १८/१०/२०२६ रोजी आय. टी. आय मैदान अकोट येथे दंगा काबु योजना राबविण्यात आली. सदर दंगा काबु योजणेत अकोट उपविभागातील पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी व अमलदारांनी सहभाग घेतला. आपतकालीन परिस्थीतीत त्वरीत प्रतिसाद देणे जमावावर कायदेशिर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दंगा काबु योजनेदरम्यान सराव करण्यात आला.तरी दि. १९/१०/२०२६ रोजी होवु घातलेल्या दुर्गादेवी विसर्जनादरम्यान सर्व नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे पोलिस स्टेशन अकोट शहरच्या वतीने आवाहण करण्यात येत आहे.
