आमसरी गावाजवळ अज्ञात कंटेनरची कारला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

आमसरी गावाजवळ अज्ञात कंटेनरची कारला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

नांदुरा तालुका प्रतिनिधी संदेश पहुरकर

आमसरी गावाजवळ आज रात्री एका अज्ञात कंटेनर वाहनाने कारला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. कारमध्ये प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित असून काहींना किरकोळ दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेची माहिती संबंधित प्रशासन व पोलिसांना देण्यात आली असून अज्ञात कंटेनरचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी रात्रीच्या वेळी वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *