दिव्यांग बांधवांचा शासनाला अल्टिमेट

दिव्यांग बांधवांचा शासनाला अल्टिमेट

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

वारंवार तोंडी व लेखी पत्र व निवेदन देऊन सुद्धा शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयाला दिव्यांग बांधवांना चढण्या उतरण्याकरिता रॅम बसवणे चा शासन निर्णय आहे . त्या अंतर्गत तहसील कार्यालयाला रॅम ची अत्यंत आवश्यकता आहे. तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार कार्यालय असल्याकारणाने तेथे दिवसातून अनेक वृद्ध, दिव्यांग व्यक्ती येत असतात त्यामुळे त्यांना चढण्या उतरण्याकरिता अतोनात त्रास होतो अशा सर्व लोकांना चढण्या उतरण्यास सुलभ मार्ग म्हणून शासन निर्णयानुसार रॅम तयार करून द्यावे. अशा पद्धतीचे निवेदन दिनांक:-१५/०७/२०२६ रोजी देण्यात आले होते निवेदन देऊन साधारणता दोन महिने झाले परंतु आज पर्यंत निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली निवेदनाची दखल घेण्यात आले नसल्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांनी नाराजीची भावना व्यक्त केली आणि तसेच दिनांक:-०८/०९/२०२६ वार मंगळवार ला रॅम्प च्या ठिकाणी बेशरम चे झाड लावून निषेध नोंदवल्या जाईल याची सर्व जबाबदारी शासन यांची राहील करिता पुनश्च निवेदन सादर. निवेदन देतेवेळी उपस्थित दिव्यांग बंधू. नारायण महाले, तेजराव पाटील, सरदार अवासे, अविनाश दिगंबर, श्रीरंग बहादुरे, नितीन कोकाटे, पुंडलिक तायडे, संतोष पारस्कर, सुनील आगाशे, रती राठी, रमाकांत चिम, राहुल चंदनकर आधी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *