
मुलींच्या आरोग्य स्वच्छता व पौष्टिक आहाराबाबत पालकांनी जागरूक राहावे ज्योती पखाले माता पालक संघाची स्थापना
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मुलींना पुढे जाण्यासाठी भरपूर वाव आहे पालकांनी मुलींचा नियमित अभ्यास घ्यावा त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधावा मोबाईलचा वापर कमीत कमी करावा शाळा व पालक यांचा नेहमी समन्वय ठेवावा तसेच मुलींच्या आरोग्य स्वच्छता व पौष्टिक आहाराबाबत पालकांनी जागरुक असावे असे मत ना ना मुंदडा विद्यालयात माता पालक संघाच्या स्थापनेच्या वेळी ज्योती पखाले यांनी व्यक्त केले.
येथील ना ना मुंदडा विद्यालयात तीन सप्टेंबर रोजी माता-पालक संघाची स्थापना होऊन त्यांची सभा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका संध्या उंबरकर या होत्या त्या प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सविता क्षिरसागर, मंजुश्री खोंड, मलीता राठोड तसेच पालक प्रतिनिधी प्रियंका दंडगे, स्मिता वानखेडे, ज्योती पखाले या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती जिजा माता सावित्रीबाई फुले व शेठ नारायणदासजी मुंदडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी आलेल्या माता व विद्यालयातील महिला शिक्षिका यांच्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि माता पालक संघाची स्थापना करून विद्यालयातील मुलींच्या मातांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन जया घुगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया झळके यांनी केले तर आभार प्रदर्शन दुर्गा महल्ले यांनी केले.
