
तडीपारी कागदावरच? २७ जणांवर आदेश, तरी अनेकजण घरातच खुलेआम!अकोट ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह; ‘अर्थपूर्ण संबंधां’च्या चर्चेने खळबळ
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांनी २७ जणांवर तीन दिवसांच्या तडीपारीचे आदेश काढले. मात्र, या कारवाईनंतरच पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तडीपार झालेले अनेकजण पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून आपल्या घरातच लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पोलिसांनी आदेश काढले, कारवाईची घोषणा केली; मग तडीपार आरोपी प्रत्यक्षात हद्दीबाहेर गेले का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. काही तडीपार व्यक्ती आपल्या कुटुंबासह घरातच राहत असल्याची चर्चा असून, त्यामुळे तडीपारीचा आदेश प्रत्यक्षात अंमलात आला की केवळ कागदावरच राहिला? याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांशी काही तडीपार व्यक्तींचे ‘अर्थपूर्ण संबंध’ असल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे. ही बाब खरी असल्यास तडीपारीच्या कारवाईलाच सुरुंग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित तडीपार व्यक्ती सध्या नेमक्या कुठे आहेत, आदेशानंतर त्यांना हद्दीबाहेर पाठवण्यात आले का आणि आदेशाचे उल्लंघन होत असल्यास पोलिसांनी कोणती कारवाई केली, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये बोर्डी येथील अरुण रूपलाल जयस्वाल, लक्ष्मीकांत प्यारेलाल जयस्वाल, नारायण भिकाजी चंदन, सतीश शिवचरण जयस्वाल, गणेश समाधान काकडे; शिवपूर येथील राजेश कमलनारायण जयस्वाल, पंजाब शहादेव मोडक; धारुळ येथील शांतीराम वीरसिंग सस्त्या; रामापूर येथील गोपाल विष्णू डाफे, प्रकाश हरीभाऊ आग्रे; सुकळी येथील संतोष हरिदास बुंदे; उमरा येथील ज्ञानेश्वर शहादेव भारसाकळे, गोविंदा नागोराव इंगळे, उदयभान उर्फ राजू नारायण केदार, विजय प्रल्हाद मरसकोल्हे; पोपटखेड येथील संजय गोटू महले, गजानन शंकरराव सालपेकर, दिलीप जयकिशोर जयस्वाल, गणेश नागेश सालपेकर,इब्राहीम खा युसुफ खा,जीवन दगडू मोरे,शहानुर येथील शेख शेरू शेख जमीर, शेख सुलतान शेख छोटू,राहणापूर येथील गुरुसिंग कलसिंग तडेला,किशन शहानु ढिगर,गणेश चन्यूलाल मावसकर आणि मलकापूर गोंड येथील संजय बाबुलाल कासदेकर यांचा समावेश आहे.दरम्यान,बोर्डी येथील शाम अर्जुन लटकुटे व रवींद्र अर्जुन लटकुटे यांचीही नावे पुढे आली आहेत. त्यांच्या तडीपारीबाबतची अधिकृत स्थिती पोलिसांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. *तडीपारीचा आदेश म्हणजे फक्त कागदावरील शाई की प्रत्यक्षात पोलिसांचा धाक?* हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष पडताळणी करून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांसह निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवरही कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे.
