अकोट न पा चे प्रवेशद्वारास ग्रामदैवत नरसिंग महाराज यांचे नाव द्यावे संदीप भुस्कट

अकोट न पा चे प्रवेशद्वारास ग्रामदैवत नरसिंग महाराज यांचे नाव द्यावे संदीप भुस्कट

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

येथील नगरपालिकेची प्रशस्त इमारत असून त्याला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारास अकोटचा ओळख तसेच अकोट शहराचे ग्रामदैवत नरसिंग महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिक नरसिंग ग्रुप चे सर्वश्री संदीप भुस्कट यांनी केली असून याअगोदर सुद्धा 14/9/2016 मधे त्यांनी व त्यांचे सहकारी सर्वश्री संदीप भुस्कट,सचिन पागृत,नैमिष सेजपाल, वल्लभ जोत, सचिन पेठे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी यांचे कडे केली होती
त्याचे रिसिव्ह कॉपी सुद्धा त्यांचे कडे आहे,यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक पक्ष श्रेष्ठी ,पक्षप्रमुख यांनी सहकार्य करावे अशी विनंती सुद्धा ते करत आहेत.ही एक गैर राजकीय मागणी आहे व वस्तू स्थितीला घेऊन आहे, सोबत संदर्भ म्हणून त्यावेळेस दिलेले निवेदन ची कॉपी व सोसियल मीडिया पोस्ट सुद्धा शेअर करत आहोत.सर्व जागरूक नागरिक व पत्रकार मंडळी सुद्धा या विधायक कामी सहकार्य करतील ही आशा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *