
लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ येथे रक्षाबंधन सोहळा थाटात संपन्न.
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
सेंट पॉल अकॅडमी द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ अकोला रोड अकोट येथे दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सोहळा मोठ्या थाटा-माटात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, उपाध्यक्ष लुणकरणजी डागा, सचिव प्रमोद चांडक, रेखा चांडक, शारदा लखोटिया, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर पातोंड, बचपन प्लेस्कूलच्या मुख्याध्यापिका कोमल मन्नी मॅडम, इनचार्ज विशाल चांदूरकर, ज्यु. कॉलेजच्या इनचार्ज सौ.निलिमा देशमुख मॅडम यांची मंचावर उपस्थिती होती.या कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सर्व मुलींनी राखी बांधून आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या.मुलांनी भेट म्हणून त्यांना पेन्सिल दिल्या.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर पातोंड सरांनी राखीचे महत्त्व, बहीण भावाचे प्रेमळ नाते यावर प्रकाश टाकला.सर्वांनी कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला.कार्यक्रम संपल्यानंतर मुलांनी मास्टर ड्रॉईंग स्ट्रोक स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
