
खा. डॉ.अनिल बोंडे यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या पराग गुडदे वर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी:- संजय आठवले भाजपा एस सी मोर्चा चे संजय आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार सादर
अमरावती (प्रतिनिधी)
दिनांक 29 ऑगस्ट 2026 भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे सन्माननीय खासदार डॉ अनिल बोंडे साहेब हे संविधानिक पदावर कार्यरत आहेत अमरावती येथील पराग गुडधे नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावरून डॉ.अनिल बोंडे साहेबांच्या वडिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केली आहे. आणि डॉ अनिल गुंडे साहेबांना तोंड फोडण्याची उघड धमकी दिली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि निषेधार्य आहे. एका संविधानिक पदावर असलेल्या खासदाराला अशी धमकी देणे हा लोकशाहीवर हल्ला आहे. त्यांच्या वयोवृद्ध वडिलांना शिवीगाळ करणे हे अत्यंत असंस्कृत कृत्य आहे. अशा गैर कृत्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो.आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन संतापाची लाट पसरली असल्याचे भाजपा पदाधिकारी संजय आठवले यांनी दिलेल्या लेखी तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे धमकीचे घरगुती व वक्तव्य करणाऱ्या पराग गुडदे या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष संजय आठवले महामंत्री दादाराव स्वर्गे,प्राध्यापक उद्धव पारवे, ज्ञानेश्वर झोंबाडे, गणेश कलाने, अनुसूचित जमातीच्या अमरावती विद्यापीठ अध्यक्ष मीनाताई चव्हाण, चेतन निंदाने, श्रद्धा चव्हाण शेख अनवर भाई यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. डॉ.अनिल बोंडे साहेबांना तोंड फोडून टाकीन अशी उघड व गंभीर स्वरूपाची जीवे मारण्याची आणि दुखापत करण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या वडिलांना सुद्धा अत्यंत अर्वाच्य अश्लील व गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून त्यांचा घोर अपमान केला आहे. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करून धमकावणे हा भारतीय लोकशाहीचा व संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तसेच भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तसेच सन्माननीय डॉक्टर अनिल बोंडे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याचा भविष्यात उद्रेक होऊन शांतता व सुव्यवस्था बाधित होऊ शकते असे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना उघड धमकी देणाऱ्या पराग गुडदे नावाच्या व्यक्तीवर भारतीय न्याय दंड संहिता बियाणे 2023 अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे जाणीवपूर्वक अपमान करून शांतता भंग करणे बदनामी व शिवीगाळ करणे आणि आयटी ॲक्ट कलम 67 नुसार कार्यवाही करण्यात यावी अशी लेखी तक्रार भाजपा पदाधिकारी संजय आठवले यांच्या नेतृत्वात दादारावजी स्वर्गे प्राध्यापक उद्धव पारवे ज्ञानेश्वर झोंबाळे गणेश कलाने मीनाताई चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे फेजरपुरा अमरावती शहर या ठिकाणी देण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना अमरावती शहरांमध्ये कायद्याचे राज्य अबाधित राहण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रति माननीय संपादक साहेब/ जिल्हा प्रतिनिधी दैनिक…. अमरावती उपरोक्त बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही आपणास कळकळीची नम्र विनंती आपला स्नेहांकित संजय आठवले उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी एससी मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीण
