
दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभागातील पेन्शन घोटाळा मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अधिपत्याखाली द्वि सदस्य चौकशी समितीचे गठन
अमरावती तालुका प्रतिनिधी
आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश तिवसा तहसील अंतर्गत सुरवाडी येथील श्री प्रशांत शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय या शाळेतील काळजीवाहक नामदेव शेलोटकर व सह कोषाध्यक्ष तथा विशेष शिक्षक आशिष भाऊसाहेब चुनडे यांनी नियमबाह्य नियुक्तीच्या आधारे शासनाची फसवणूक करून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांनी घेतलेली पेन्शन तात्काळ सरकारी तिजोरीमध्ये जमा करणेबाबत आणि पुरुषोत्तम शिंदे यांना सक्तीने रजेवर पाठवून तक्रारीची चौकशी करण्यासंदर्भात भाजपा एससी मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस प्राध्यापक उद्धव पारवे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या स्तरावरून सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शिफारसीसह दिव्यांग कल्याण सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 20/08/ 2026 रोजी पाठविलेल्या पत्रान्वये मागितला आहे.
