
बोर्डीत श्री.नागास्वामी महाराज यात्रा महोत्सवाची जयंत तयारी सोमवारी यात्रोत्सव,मंगळवारला रथयात्रा गोपाळकाला व महाप्रसाद
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले शासनमान्य ब वर्ग तीर्थक्षेत्र रजीस्टेशन A 299 संत नागस्वामी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान श्री.नागास्वामी महाराज यात्रा महोत्सवाची जयंत तयारी सुरू आहे.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रोत्सवासाठी मंदिर परिसराची स्वच्छता,सजावट तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची तयारी करण्यात आली आहे.दरवर्षी प्रमाणे यंदा सोमवार (ता.३१ ऑगस्ट) रोजी यात्रोत्सव होणार.त्यानंतर मंगळवार (ता.१) रोजी रथयात्रा गोपाळकाला व महाप्रसादाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.श्री.नागास्वामी महाराज संस्थान बोर्डीच्या वतीने आयोजित या यात्रेला परिसरातील तसेच अकोट तालुक्यासह विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यात्रेनिमित्त मंदिरात धार्मिक विधी,पूजा,अर्चना व दर्शनासाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.आकर्षक सजावटीने मंदिर परिसर सजलेला आहे.यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री.नागास्वामी महाराजांच्या मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.फुलांची आरास,विद्युत रोषणाई आणि पारंपरिक पद्धतीने सजविण्यात येणाऱ्या रथामुळे यात्रेचे धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय होणार आहे.भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी संस्थानच्या कार्यकारी मंडळाकडून विशेष नियोजन केले आहे.दोन दिवस गोपाळकाला व महाप्रसाद यात्रेनंतर १ ला गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला पंचकोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री.नागास्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.नागास्वामी महाराज संस्थान बोर्डी,कार्यकारी मंडळ व समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.यात्रा दोन दिवसांची निमंत्रणपत्रिकेनुसार १ सप्टेंबर ते २ सप्टेंबर २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत यात्रेचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत.त्यामुळे भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांसोबतच दर्शन व महाप्रसादाची विशेष पर्वणी उपलब्ध होणार आहे.
