पुंडा नंदीग्राम तरूण मंडळींचे ग्राम विकासासाठी गट विकास अधिकारी अकोट यांच्याकडे साकडे

पुंडा नंदीग्राम तरूण मंडळींचे ग्राम विकासासाठी गट विकास अधिकारी अकोट यांच्याकडे साकडे

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील पुंडा नंदीग्राम गावामध्ये अनेक वर्षापासून ग्रामपंचायत द्वारे विकास कामे रखडली आहेत.गावातील विविध समस्या बाबत चिंता व्यक्त होत आहे.पिण्याचे पाणी अशुद्ध मिळत असून यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे.गावातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गावातील सांडपाणी नाल्यांची दुरवस्था झाली असून, ग्रामपंचायत तर्फे गावातील नाल्यांचा उपसा अद्याप पर्यंत करण्यात आला नाही.ग्रामपंचायतीला शासनामार्फत मिळालेल्या वस्तू कुठे गायब झाल्या हा प्रश्न गाववासीयांना पडला आहे.ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या खोल्या वैयक्तिक वापरासाठी वापरल्या जात असून त्या लवकरात लवकर ग्रामपंचायतीने ताब्यात घ्याव्या अशी मागणी होत आहे.तसेच गावात मोठ्या प्रमाणात घाणकचरा निर्माण झाला असून अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा प्रकारे अनेक समस्यांचा लेखाजोखा घेऊन पुंडा नंदीग्राम गावातील तरुण मंडळींनी अकोट गट विकास अधिकारी त्यांच्याकडे निवेदन दिले.गावात येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी.ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी तक्रारी व विकास कामाबाबताच्या मागण्या जाणून घ्याव्यात,तसेच गावातील समस्यांबाबत संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतीला आवश्यक त्या सूचना द्याव्यात असे निवेदनात सादर करण्यात आले.या सर्व समस्यांबाबत निवेदन देत गट विकास अधिकारी यांच्याकडे
संपूर्ण विकास कामाबाबत साकडे घालण्यात आले.निवेदन सादर करत्यावेळी शुभम धनराज कुलट,गजानन कैलास अंबुलकर,प्रसाद मदनराव कुलट,सचिन प्रमोद कुलट,दिपक अनिल कोगदे, मोहीत विठ्ठलराव आयोल,वैभव रामेश्वर कुलट,विजय प्रभाकर कुलट,नंदू सुधाकर धांडे, श्रेयश रामेश्वर अंबुलकर,विशाल श्रीकृष्णराव भरणे,अंकित प्रकाश कुलट,विशाल विकास कुलट,राज सुदनराव कुलट,ऋषिकेश दिनकर कुलट,विठ्ठल प्रल्हाद कोगदे यांच्यासह पुंडा नंदिग्राम गावातील असंख्य तरुण मंडळींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *