गुरेढोरे, वन्यजीवांच्या चारा पाण्याचा सवाल बिकट ?नाले, नदीपात्र पडले कोरडे तालुक्यात पाणीबाणी

गुरेढोरे, वन्यजीवांच्या चारा पाण्याचा सवाल बिकट ?
नाले, नदीपात्र पडले कोरडे तालुक्यात पाणीबाणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

यावर्षी आक्टोम्बर मध्येच तालुक्यात नदी,नाले कोरडे पडले असून रानावनात गुरेढोरे व वन्यजीवांच्या चारा पाण्याचा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे दुष्काळात जनते समोर या पाणीबाणी मुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पशूपालकांपूढे गुराढोराच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे तर वन्यजीव पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत.तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील किन्हिराजा परिसरातील गाव तलाव नदी विहिरींचा पाण्याचा पातळीत कमालीची घट होत असून गाव तलाव नदी नाले व विहीरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे चित्र दिसत आहे.किन्हिराजा परिसरातील कवरदरी, रामराववाडी, पींपळशेंडा, कुत्तरडेह, अमानवाडी, परिसरात आक्टोम्बर मधेच ही समस्या पहायला मिळत आहे.
या परिसरातून काटेपूर्णा नदी सह आणखी दोन मोठ्या नद्या वाहतात या सर्व नद्या महानच्या धरणाला जावून मिळतात. अमानवाडीची नदी कवरदरी ची नदी या प्रमुख नद्याअसुन या नदीला दरवर्षी वर्षभर ही पाणी राहते परंतू यावर्षी अमानवाडीची नदीपात्र व कवरदरी चे नदीपात्र हे आक्टोम्बर च्या दुसऱ्याच आठवड्यात कोरडे पडलाने गुराढोराच्या वन्यजीवांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दुसरी कडे मेडशी परिसरातून वाहणारी मोर्णा नदी व त्यावर अकोला पूरनियंत्रणासाठी तयार केलेले उर्ध्व मोर्णा प्रकल्प कोरडे पडले असून इतर लहान मोठे नाले सुध्दा केंव्हाच आटले आहेत.
याबरोबरच अडोळ प्रकल्पाच्या भिंतीपाशी पाण्याची साठवण क्षमता पोहचल्याने शिरपूर व रिसोड च्या पाणी योजना अडचणीत सापडला आहेत.
कळंबेश्वर प्रकल्प, कळंबेश्वर , सोनाळा, आमखेडा तलाव, सुकांडा,केळी, कोल्ही धरण, डव्हा गावाजवळील काटेपूर्णा प्रकल्पांतून मालेगाव ची पूरक पाणी पुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. मालेगाव पाणी योजनेचा कुरळा पाझर तलाव आटल्यातच जमा आहे. इतर लहान मोठे धरणे, तलाव, पाझर तलाव, गांव तलाव मृत जल साठ्याला भिडले आहेत.
शासकीय यंत्रणांनी पाठपुरावा लकर सुरू केला व शासनाने त्याला तितक्याच वेगाने साद घातली तरच या पाणीबाणीतून तालुक्याची सुटका होईल. अश्या प्रकारची आजची स्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *