
वृद्धाश्रमात वृद्धांची वैद्यकीय तपासणी.
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
ता.२८येथील युनिक क्लिनिकल लॅब च्या वतीने "ईद-ए-मिलाद" निमित्ताने स्थानिक माऊली वृद्धाश्रमात वृद्धांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.वृद्धाश्रमातील अनेक वयस्कर जेष्ठ स्त्री पुरुषांची रक्त तपासणी युनिक क्लिनिकल लॅबच्या वजाहत समीनखान यांनी केली. शारीरिक तपासणी करून औषधोपचार करून औषधे वाटप केले. मुल्ला क्लिनिकचे तज्ञ डॉक्टर अब्दुल रहमान मुल्ला यांनी निशुल्क सेवा दिल्या बद्दल.माऊली वृद्धाश्रमाच्या संचालक प्रांजली ताई पाध्ये आणि ताईच्या आईंनी मोलाचे सहकार्य केले. वैद्यकीय तपासणीमुळे गरजू वृद्धांना आणि अनेक निवासी सभासदांना भरीव सहकार्य झाल्याची प्रतिक्रिया वृद्धाश्रमाचे संचालक सौ प्रांजलीताई पाध्ये व पंकज पाध्ये यांनी व्यक्त केली.यावेळी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते झिया अहेमद सर यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळु अनेक वृद्ध व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
