सामाजिक,क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विजय बेदरकर यांचा सन्मान

सामाजिक,क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विजय बेदरकर यांचा सन्मान.अकोट मेलोडी ग्रुपच्या ‘सुरों की बरसात’ कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट मेलोडी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरों की बरसात’ या बहारदार संगीतमय कार्यक्रमात सामाजिक,क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विजय पांडुरंग बेदरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अकोट येथील पुष्पांजली मंगल कार्यालय,अकोला रोड येथे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.अकोट मेलोडी ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मशहूर गायिका पूजा पूरा,खंडवा (मध्यप्रदेश) यांच्या सुमधुर आवाजातील सदाबहार हिंदी सिनेसंगीताने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.विजय बेदरकर हे ज्योशिबा सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच अकोट सी.सी.क्रिकेट क्लबचे कार्याध्यक्ष आहेत.सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अकोट मेलोडी ग्रुपच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात आपण केलेले कार्य समाज व देशहितासाठी असून प्रेरणादायी आहे.आपण केलेल्या उल्लेखनीय सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन आपला गौरव करण्यात येत आहे. असेच उदात्त कार्य आपल्या हातून घडत राहो,” अशा शब्दांत विजय बेदरकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.अकोट मेलोडी ग्रुपचे अध्यक्ष श्री.योगेशजी वर्मा व सचिव श्री.भास्करराव वानखडे तसेच मेलोडी ग्रुप चे पदाधिकारी यांच्या हस्ते विजय बेदरकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उद्योजक नंदू शेगोकर,पोलीस अधिकारी हिंमत दंदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सत्कार स्वीकारताना विजय बेदरकर यांनी अकोट मेलोडी ग्रुपचे आभार व्यक्त केले.मिळालेला हा सन्मान सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.शेकडो नागरिक व संगीतप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीताच्या सुरेल मेजवानीसोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून अकोट मेलोडी ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *