महात्मा फुले कन्या शाळेची जागा वाचविण्यासाठी कांग्रेस पक्षाची उच्च न्यायालयात धाव

महात्मा फुले कन्या शाळेची जागा वाचविण्यासाठी कांग्रेस पक्षाची उच्च न्यायालयात धाव

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद: कांग्रेस पक्षाच्या वतीने याचिकाकर्त्या डॉ. समीना परवीन शाकीर खान, नगरसेविका, नगर परिषद जळगाव जामोद यांनी म. फुले माध्यमिक कन्या विद्यालयाच्या १२०० चौ.मी. जागेचा रुग्णालयासाठी वापर करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या PIL No. 58/2026 वर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे मा. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर व मा. न्यायमूर्ती रजनीश आर. व्यास यांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावणी घेत संबंधित पक्षकारांना नोटीस बजावली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ सप्टेंबर २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.याचिकेत सदर जागा शाळेच्या क्रीडांगण व विहिरीसह मूलभूत सुविधांचा भाग असून ती रुग्णालयासाठी दिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांवर परिणाम होईल, असा मुद्दा मांडण्यात आला आहे.विद्यार्थी व जनहिताच्या दृष्टीने मा. उच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.या संपूर्ण संघर्षांत काँग्रेस पक्षनेत्या आदरणीय स्वाती ताई वाकेकर, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, ॲड. संदीप मानकर तसेच काँग्रेसच्या पाचही नगरसेविकांसह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *