
सहृदय तथा कर्तबगार असणाऱ्या व्यक्तित्वाचा गुणगौरव,अॅड. गजानन पुंडकर अशोकराव पाचडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
समाजामध्ये वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी लाभलेले अनेक व्यक्तिमत्व बघायला मिळतात.परंतु स्वविकासह सामाजिक विकासाची जाण ठेवणारे सहृदय आणि तेवढेच कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजे अशोकराव पाचडे होत,असे भावपूर्ण उद्गार श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष अॅड.गजानन पुंडकर यांनी व्यक्त केले.श्री संत वासुदेव महाराज पुण्यभूमी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे श्री अशोक पाचडे यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, श्री अशोकराव पाचडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य केवळ धार्मिक क्षेत्रातच नसून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.आसेगाव बाजार येथील सेवा सहकारी सोसायटीचा नावलौकिक त्यांंनी संपूर्ण महाराष्ट्राभर गाजविला.अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सर्वप्रथम सद्गुरु श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर पाचडे यांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प गौरव पत्र,श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोटचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महाराज महल्ले,विश्वस्त मंडळाचे महादेव ठाकरे,पुरुषोत्तम लाजुरकर,रवींद्र वानखडे,नंदकिशोर हिंगणकर, गजाननराव दुधाट,केशवप्रसाद राठी,पुरुषोत्तम मोहोकार, मध्यस्थी वधू वर सूचक मंडळाचे नागोराव वानखडे,जयकृष्ण वाकोडे,मधुकर पुंडकर,नंदकिशोर जांभुळकर,साहेब मंगळे,राममुर्ती वालसिंगे,सुरेंद्र चिकटे, विठ्ठलराव मंगळे,ज्योतीताई कुकडे,वृंदाताई मंगळे,महादेवराव बोरोकार,रणजीत पाचडे,अमोल मानकर,दिलीप कुलट,आदी मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास महाराज मानकर,सूत्रसंचालन उमेश महाराज मोहोकार, आभार प्रदर्शन गजानन दुधाट यांनी केले.याप्रसंगी रवींद्र वानखडे,नंदकिशोर हिंगणकर,अशोक अढिया,वैभव पाचडे,आकाश काळमेघ,लताताई चिकटे,रोशनी घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना पाचडे म्हणाले आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद यांमुळे अनेक प्रसंगावर मात करीत इथपर्यंत जीवन प्रवास झाला असून पुढेही श्री गुरु सेवा घडत राहावी अशी विनम्र मागणी त्यांनी मागितली.
चौकट
श्री संस्था सेवा कार्यात महत्वपूर्ण योगदान
श्री.ह.भ.प. वासुदे महाराज महल्ले
अभिष्टचिंतन सोहळा सत्कारमूर्ती अशोक पाचडे यांचे श्री संस्था सेवा कार्यात फार महत्त्वपूर्ण योगदान असून संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात दिलेला वेळ, सहयोग अत्यंत उल्लेखनीय आहे.त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनेक आघातांमध्ये सद्गुरु श्री संत वासुदेवजी महाराज यांनी त्यांचे रक्षण करून त्यांना दीर्घायुषी केले आहे.श्री गुरु सेवेबरोबरच त्यांना इतर अनेक संतांची,महाराज मंडळींची,संप्रदायाची सेवा करण्याचे सद्भाग्य लाभले आहे.मध्यस्थी मंडळाचे ते उपाध्यक्ष असून येथील सेवाभार समर्थपणे पेलत आहेत. अतिशय मिश्किल व शब्दचमत्कृती पूर्ण भाषेने ते अनेकांना आपलेसे करून घेतात.त्यांचा संपर्क अतिशय दांडगा असल्याने श्रीगुरु सेवा कार्य करताना त्यांच्या माध्यमातून संस्थेला फार मोठी मदत होत आहे.असे गौरवोद्गार संस्थाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेव महाराज महल्ले यांनी व्यक्त केले.
