जळगाव जामोद तालुकास्तरिय शालेय गट क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव जामोद तालुकास्तरिय शालेय गट क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न..

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी

विविध वयोगटांततील विजयी संघांची जिल्हास्तरावर मजल.क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जामोद तालुकास्तर शालेय गट क्रिकेट स्पर्धा २०२६–२७ अत्यंत उत्साहात पार पडली. या क्रीडा महोत्सवात तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करत आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगाव शिक्षण मंडळ, जळगाव जामोदचे अध्यक्ष/सचिव अनुप पुराणिक यांनी भूषवले. याप्रसंगी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश माई, डॉ. प्रवीण डाबरे, प्रशासकीय अधिकारी वहीत आणि तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येऊल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येऊल यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. उपस्थितांचे स्वागत व मार्गदर्शनानंतर अत्यंत चुरशीच्या वातावरणात क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली.स्पर्धेचे अंतिम निकाल: * १४ वर्षे वयोगट: * विजयी संघ: नगरपरिषद उर्दू माध्यमिक शाळा, जळगाव जामोद * उपविजेता संघ: केशव विद्या मंदिर, जळगाव जामोद * १७ वर्षे वयोगट: * विजयी संघ: दि न्यू इरा हायस्कूल, जळगाव जामोद * उपविजेता संघ: केशव विद्या मंदिर, जळगाव जामोद * १९ वर्षे वयोगट: * विजयी संघ: सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद * उपविजेता संघ: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोदस्पर्धेतील सर्व विजयी संघ आता आगामी जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत. खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.सामन्यांचे यशस्वी आयोजन व पंच म्हणून निखिल खंडारे, यश जाधव आणि महेन्द्र चंद्रले यांनी निष्पक्षपणे जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचा समारोप हरीश शर्मा यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *