जळगाव जामोद शहरातील राजा भरत्री नाथ मंदिर परिसरातील सीसीटीव्ही बंद नागरिक आक्रमक

जळगाव जामोद शहरातील राजा भरत्री नाथ मंदिर परिसरातील सीसीटीव्ही बंद नागरिक आक्रमक

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद : राजा भरत्री परिसरातील नगर परिषदेकडून बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुर्गादेवी मंदिरातील देवीच्या मुकुटाची १४ जुलै रोजी पुन्हा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला.दुर्गादेवी मंदिराचे अध्यक्ष अंबादास भाकरे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन बंद कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष संजय खेकाडे, तसेच नगरसेवक सय्यद नफीस उपस्थित होते.राजा भरतरी परिसरात विविध धार्मिक स्थळे असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. चोरीच्या घटनेचा तपास करताना बंद सीसीटीव्हीमुळे अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.सीसीटीव्ही यंत्रणेची सखोल चौकशी करून बंद कॅमेरे तातडीने सुरू करावेत आणि सुरक्षा व्यवस्था कायमस्वरूपी कार्यरत ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *