
आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्याकडून अकोला विभागाचा आढावा
वाशिम,जिल्या प्रतिनिधि अनिल जाधव
दि. 17 : राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी आज जिल्हा परिषद, वाशिम येथे अकोला विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांतील जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हानिहाय विविध आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीस सहसंचालक आरोग्य सेवा डॉ. राधाकिशन पवार, अकोला विभागाचे उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, सहा.संचालक डॉ. तरंग तुषार वारे, सहाय्यक संचालक हिवताप डॉ. अन्सारी यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत, कीटकजन्य आजार, जलजन्य आजार, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, 108 व 102 रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती, संस्थात्मक प्रसूती, लसीकरण, कुटुंब नियोजन तसेच बोगस पदवीधारक वैद्यकीय व्यावसायिकांवर नियंत्रण आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.तसेच शालेय आरोग्य तपासणी, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती, ग्राम आरोग्य, पोषण व पाणीपुरवठा स्वच्छता समिती, महिला आरोग्य समिती यांच्या कामकाजाची व्याप्ती, कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबतही चर्चा करण्यात आली. औषधसाठा, लसींची उपलब्धता, लस साठवणूक व शीतसाखळी व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, आरोग्य विषय योजना प्रचार प्रसिद्धी जनजागृती वाढविणेसध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पदंशाच्या रुग्णांना वेळेत व तत्पर उपचार मिळतील, यासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याच्या सूचना आयुक्त संजय काटकर यांनी दिल्या. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.बैठकीदरम्यान डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीच्या शेवटी डॉ. तरंग तुषार वारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
