अमानी येथे २५ वर्षांपासून ज्येष्ठ गौरीची अखंड परंपरा; सौ. उषा जाधव यांच्याकडून भक्तिभावाने स्थापना

अमानी येथे २५ वर्षांपासून ज्येष्ठ गौरीची अखंड परंपरा; सौ. उषा जाधव यांच्याकडून भक्तिभावाने स्थापना

मालेगाव जिल्हा (प्रतिनिधी) अनिल जाधव

मालेगाव तालुक्यातील अमानी येथील शेतकरी महिला तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. उषा अनिल जाधव या गेल्या २५ वर्षांपासून आपल्या निवासस्थानी ज्येष्ठ गौरीची स्थापना करून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जतन करीत आहेत. दरवर्षी गणेशोत्सव काळात सौ. जाधव यांच्या घरी ज्येष्ठ गौरीचे आगमन अत्यंत भक्तिमय वातावरणात होत असून, विधिवत पूजा-अर्चा, आरती व नैवेद्य अर्पण करून देवीची सेवा केली जाते. या निमित्ताने नातेवाईक, महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहतात.
सौ. उषा जाधव यांनी जपलेली ही २५ वर्षांची अखंड परंपरा गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, धार्मिक संस्कार व सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *