
नांदुरा पोलिसांचे नागरिकांना आवाहन : चोरी, घरफोडी रोखण्यासाठी सतर्क राहा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, CCTV बसवा व संशयित व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना द्या
नांदुरा तालुका प्रतिनिधी (संदेश पहुरकर )
गावांमध्ये चोरी, घरफोडी व इतर गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरा पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार घरातील मौल्यवान दागदागिने व महत्त्वाच्या वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. घरात अनावश्यक रोख रक्कम ठेवू नये तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेरील दिवे सुरू ठेवावेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, घरात मोठी रक्कम किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. गावात येणाऱ्या अनोळखी फेरीवाल्यांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती नोंदवावी. ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी रात्री नियमित गस्त घालावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.गावात कोणतीही संशयित व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करून सार्वजनिक ठिकाणी पुरेसा प्रकाश राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांच्या सहकार्यामुळे चोरी व घरफोडीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल, असा विश्वास नांदुरा पोलिसांनी व्यक्त केला आहे.संपर्क :📞 नांदुरा पोलीस स्टेशन : 07265-221028🚨 आपत्कालीन मदत क्रमांक : 112
