जळगाव जामोदमधून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता पोलिसांनी शोधमोहीम सुरू

जळगाव जामोदमधून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांनी शोधमोहीम सुरू

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. 86/2026 नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला असून नागरिकांना माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. विजय हरीभाऊ इंगळे (वय 53 वर्षे), रा. सुलज, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी कु. गायत्री विजय इंगळे (वय 22 वर्षे) ही दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10.00 वाजण्याच्या सुमारास शिलाई मशीनचे सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा गावात, परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून न आल्याने रात्री जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आला.हरवलेल्या तरुणीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – रंग सावळा, बांधा मजबूत, उंची सुमारे 5 फूट, केस लांब व काळे, अंगात काळ्या रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लेगिंग व पायात सँडल होती.या प्रकरणाची नोंद मिसिंग क्र. 86/2026 अशी करण्यात आली असून, सफौ गजानन सातव (ब. नं. 1631) यांनी नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉ तयबअली सयद (ब. नं. 645) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.पोलीसांचे आवाहन :सदर तरुणीबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास जळगाव जामोद पोलीस स्टेशन किंवा तपास अधिकारी पोहेकॉ तयबअली सयद (मो. 8888823011) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या एका माहितीमुळे बेपत्ता तरुणीचा शोध लागण्यास मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *