जळगाव जामोद मोबाईल दुरुस्तीसाठी घराबाहेर पडलेला 30 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल

जळगाव जामोद : मोबाईल दुरुस्तीसाठी घराबाहेर पडलेला 30 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद | प्रतिनिधीतालुक्यातील दादुलगाव नवे येथील 30 वर्षीय युवक गोपाळ सोपान बहाळे हा मोबाईलची स्क्रीन दुरुस्त करून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र तो परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्यामुळे जळगाव जामोद पोलीस ठाण्यात बेपत्ता (मिसिंग) म्हणून नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी मिसिंग क्रमांक 84/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोपान गोविंदा बहाळे (वय 62, व्यवसाय – शेती, रा. दादुलगाव नवे, ता. जळगाव जामोद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा गोपाळ सोपान बहाळे (वय 30) हा दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3.00 ते रात्री 10.00 वाजण्याच्या दरम्यान मोबाईलची स्क्रीन दुरुस्त करून येतो असे सांगून घरातून निघून गेला. त्यानंतर तो परत न आल्याने नातेवाईक, परिसर व गावात शोध घेण्यात आला; मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन :नाव : गोपाळ सोपान बहाळेवय : 30 वर्षेरंग : सावळाउंची : 5 फूट 5 इंचबांधा : मजबूतकेस : काळेदाढी : बारीकअंगात : कथई रंगाचा शर्टपांढऱ्या रंगाची पँटपायात : चप्पलमोबाईल क्रमांक : 9689427720या प्रकरणी सफौ गजानन सातव यांनी मिसिंगची नोंद केली असून, पुढील तपास पोउपनि अमोल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.📞 आवाहन : वरील वर्णनाची व्यक्ती कुठेही आढळल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जळगाव जामोद पोलीस स्टेशन किंवा पोउपनि अमोल पंडीत (मो. 8390566584) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *