
मेडशी तलाठी कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मेडशी येथील तलाठी कार्यालयात ‘साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर व त्यांच्या समृद्ध साहित्यावर प्रकाश टाकला.”अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कष्टकरी, वंचित आणि शोषित घटकांच्या व्यथा मांडून समाजात मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली.” असे विचार पत्रकार जावेद धन्नू भवानीवाले यांनी काढले. तर के. एल. अवचार (ग्राम महसूल अधिकारी),जी. पी. उमाळे (ग्राम महसूल अधिकारी), घनश्याम साठे (महसूल सेवक), दिलीप ताजने (महसूल सेवक)या प्रसंगी तलाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
