
चॅम्प अबॅकस स्पर्धेत तनिष्का अकॅडमीची चमक; आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरावर मलकापूरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश विद्यार्थ्यांची मानांकने मार्गदर्शक आशा मोरे यांना ‘बेस्ट टीचर’ व ‘बेस्ट स्टार्टअप’ पुरस्कार
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : जी चॅम्प अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत तनिष्का जी चॅम्प अबॅकस अकॅडमी, मलकापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. दि. ४ व ५ जुलै रोजी आयोजित स्पर्धांपैकी हैदराबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रेयस अमोल खराटे याने प्रथम क्रमांक पटकाविला. अंकिता महादेव गुरचळ व अर्णव महादेव गुरचळ यांनी द्वितीय, तर नंदिनी राधेश्याम मेहरा हिने तृतीय क्रमांक मिळविला. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत समृद्धी विशाल इंगळे हिने ‘सुपरस्टार रँक’ मिळविली. कृष्णाली मनोज पाटील व वेदिका नानक चोपडे यांनी द्वितीय, तर नासीम खान अब्दुल कलाम खान, श्रेयश प्रधान आणि अनुष्का योगेश आसटकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्राची सिद्धार्थ तायडे, शौर्या गव्हात्रे, सोनल वानखेडे, पूर्वी वलके आणि दुर्वा ठोसर यांना ‘चॅम्पियन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अवघ्या सात मिनिटांत १०० गणिती प्रश्नांची शंभर टक्के अचूक उत्तरे देत आपल्या बौद्धिक क्षमतेची प्रभावी छाप पाडली.या यशामुळे तनिष्का जी चॅम्प अबॅकस अकॅडमीचे नाव राष्ट्रीय पातळीवरही उजळले असून मलकापूरसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. या यशामागे अकॅडमीच्या मार्गदर्शक शिक्षिका आशा कुणाल मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’ आणि ‘बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. या नेत्रदीपक यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, शालेय शिक्षणासोबत अबॅकससारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
