छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या पुकारलेल्या एल्गार लढ्याला अखेर आज यश

अखेर सरकार झुकल रोहितदादा पवार यांच्या पुढाकाराने सर्व शेतकरी नेते व शेतकऱ्याच्या एक जुटीच्या लढ्याला आज यश मिळाल.अखेर जिंकलो.

जळगाव प्रतिनिधी सुरेंद्र गवई

रोहितदादा पवार यांनी विठुरायाच्या आशीर्वादाने विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या पुकारलेल्या एल्गार लढ्याला अखेर आज यश आलं.२०१९ मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५-२६ सालचं नियमित कर्ज भरण्याची अट या दोन्ही जाचक अटी अखेर सरकारने काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली.. याबाबत रोहितदादा पवार व सर्व शेतकरी नेते ज्यानी यासाठी लढा उभारला त्यांचे आभार. – प्रसेनजीत पाटिल जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *