बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍या कृषी केंद्र चालकांवर सह कंपनीवर तात्काळ कारवाई करा मनसेची मागणी

बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍या कृषी केंद्र चालकांवर सह कंपनीवर तात्काळ कारवाई करा – मनसेची मागणी

खामगाव तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणारे कृषी केंद्र चालक व बियाणे सप्लाय करणाऱ्या ‌कंपनी यांच्याकडून होणाऱ्या फसवणूक मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आज मनसेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव व उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन बोगस बियाणे विकणारे कृषी केंद्र चालक व संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे .खामगाव तालुक्यात कृषी केंद्र धारकांकडून शेतकर्‍यांना वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे खत विक्री केल्या जात आहे. त्यामध्ये काही बियाणे हे बोगस असून पेरणी केल्यानंतर त्या शेतात उगवण अत्यल्प झाल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे बियाणे, मशागत आणि मजूरीवर झालेला खर्च वाया गेलेला असून यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.कृषी केंद्र धारकांकडून मोठ्या प्रमाणात रविउन्नती कंपनी व अंकुर सिडस कंपनीचे बियाणे विक्री केल्या जात आहे व रवीउन्नती कंपनीबाबत खामगाव कृषी विभागाकडे ३८५ तक्रारी शेतकर्‍यांनी दाखल झाल्या आहेत . यावरून असे लक्षात येते की हे एक मोठे बोगस बियाण्यांचे रॅकेट कार्यरत आहे. तसेच युरीया सह इतर खतांंची विक्री जास्त भावाने केल्या जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना बोगस बियाणे विकणार्‍या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी व वर उल्लेखीत कंपनीवर सुद्धा कारवाई करावी तसेच शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई देण्यात यावी ही विनंती. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेतकरी बांधवांना सोबत घेवून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मनसे तर्फे उपविभागीय अधिकारी खामगाव व उपविभागीय कृषी अधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी उपस्थित शहराध्यक्ष आकाश पाटील , जिल्हाध्यक्ष अध्यक्ष वाहतूक सेनाशिवशंकर नगर तालुकाध्यक्ष डॉ. जयशराम सातव शहर उपाध्यक्ष विनोद इंगळे, शहर उपाध्यक्ष दीपक सुलताने, शहर उपाध्यक्ष विजय मांडवेकर,तालुका उपाध्यक्ष सागर भोपळे, तालुका उपाध्यक्ष
आकाश वानखेडे तालुका संघटक लखन खूपसे,निखिल मांगले सागर हरसुले आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती
होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *