घनकचरा व्यवस्थापन कागदावरच प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक करता संताप व्यक्त

घनकचरा व्यवस्थापन कागदावरच प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक करता संताप व्यक्त.

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद नगरपरिषदेमार्फत दररोज घरोघरी कचरा गोळा करणारी गाडी येणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आठवड्यांपासून घनकचरा गाडी नियमितपणे येत नाही गाडी कधीतरीच येत असल्याचा आरोप गोविंदपुरा मधील काही नागरिकांनी केला असल्यामुळे घरातील कचरा साचून राहत आहे परिणामी, नागरिकांना कचरा बाहेर उघड्यावर किंवा रस्त्याच्या कडेला टाकण्यास भाग पाडले जात आहे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्मल झाला तर याला जबाबदार कोण? सदर समस्येचे गांभीर्य ओळखून, गोविंदपुरा मधील कचरा संकलन करणारी गाडी दररोज नियमितपणे येत नसल्याने गोविंदा मधील राहत असलेले नागरिकांनी दिले निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *