
काळवीट या वन्यप्राणी शिकार प्रकरणात वनविभागाची गाडेगाव खुर्द येथे कारवाई
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
दिनांक 06/07/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गाडेगाव खुर्द या ठिकाणी काळवीट या वन्यप्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. त्यानुषंगाने वनपाल पाथ्रीकर यांचे नेतृत्वाखाली एक पथक तयार करून मोका स्थळी पाठवण्यात आले असता आरोपी नामे शंकर दामा मुंढे, शिवहरी दामा मुंढे व देविदास दामा मुंढे हे त्यांचे घरी वन्यप्राणी काळवीट याचे मांस शिजवत असताना आढळून आले.त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचे विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन गुन्हा जारी करण्यात आला असून दोन आरोपी यांना अटक करण्यात आली असून एक आरोपी हा फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदर कारवाई दरम्यान काळवीट या वन्यप्राण्याचे मांस व जिंवत तितर पक्षी हयांना वनविभागाने जप्त केलेले आहे. सदर काळवीट हा वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत शेडयुल 1 मधील वन्यप्राणी असुन त्यास अतिसंरक्षीतः म्हणुन गणले जाते. तसेच तितर हा पक्षी वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसारः शेडयुल 2 मध्ये येतो. तसेच अटक करण्यांत आलेले आरोपी यांना विद्यमान प्रथम वर्ग न्यायालय यांच्या समक्ष दिनांक 07/07/2026 रोजी हजर केले असता. न्यायालयाने सदर आरोपीनों चार दिवसीय वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई मा.

उपवनसंरक्षक जमीर शेख, मा. सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांचे मार्गदर्शनखाली करण्यात आली असून पुढील तपास हे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल व्ही.बी. पाथ्रीकर हे करत आहेत. सदर तपास कामी वनरक्षक निकाळजे, जाधव, धवसे, वाहन चालक गजानन कुटे यांनी सहकार्य केले आहे.वनविभाग कडून सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की कुठेही वन्यप्राणी शिकार घटना निदर्शनास आल्यास वन विभागास तात्काळ माहिती द्यावी. वन्यप्राणी याची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा असून या मध्ये कमाल 7 वर्षे कारावास व दंड असे शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणीही वन्यप्राणी याची शिकार करत असल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
