
जामोद येथे नागरिकांचे स्मार्ट मीटर विरोधात आगळे वेगळे “मीटर परत घ्या” आंदोलन.जुने मीटर बसवून द्या अन्यथा लोक नवीन मीटर स्वतः काढून महावितरण कडे जमा करतील – समाधान दामधर
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
आज दिनांक ८ जुलै रोजी जामोद महावितरण कार्यालयात नवीन स्मार्ट मीटर विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. जामोद येथील नागरिकांनी स्वतः आप-आपल्या घरातील विद्युत मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा केले व गावातील सर्व स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवून मिळण्या बाबत यावेळी शाखा अभियंता चौबारावाले व जामोद महावितरण चे सहाय्यक अभियंता हिंगणे यांना निवेदन दिले.यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री समाधान दामधर यांनी आक्रमक पवित्रा घेत “७ दिवसाच्या आत सदर मीटर बदलून द्यावे व यानंतर जामोद मध्ये कुठेही स्मार्ट मीटर बसवू नये असे सांगितले.”सदर निवेदनात नमूद आहे की, आम्ही महावितरण चे अनेक वर्षांपासून ग्राहक असून आमच्याकडे विद्युत बिलाची कुठलीही थकबाकी नसून आम्ही नियमित विद्युत बिल भरत असतो तसेच आमच्या मीटर बाबत महावितरण ला कुठल्याही प्रकारची तक्रार प्राप्त नाही. आमचे मीटर आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, आमची संमती न घेता कुण्या तरी अज्ञात व्यक्तीने परस्पर येऊन आमच्या घरासमोरील मीटर बदलले आहे. तरी आम्हाला आमचे जुने मीटर परत लावून मिळावे. आज आम्ही गावातील तांत्रिक व्यक्तींच्या मदतीने घरातील नवीन मीटर स्वतः काढून प्राथमिक स्वरूपाने आपल्या

कार्यालयाकडे जमा करीत आहोत, तरी सात दिवसाच्या आत गावातील सर्व नवीन मीटर काढून जुने मीटर परत बसून देण्यात यावे अन्यथा आम्ही आमच्या घरातील मीटर स्वतः काढून आपल्या कार्यालयात जमा करू व यामध्ये कुठलेही अनुचित घडल्यास व जीवितहानी झाल्यास महावितरण व अधिकारी म्हणून आपली संपूर्ण जबाबदारी राहील.यावेळी गणेश धर्मे, शंकर दामधर, राजू किसन धुर्डे , रमेश पंढरी धुर्डे, महादेव रांदळे, दीपक ज्ञानेश्वर धर्मे, शेख मुसा, देवकाबाई दामधर, संतोष दलाल, सचिन काळपांडे विश्वनाथ काळपांडे प्रमोद हांडे, मोहन धुर्डे , सुनील काळपांडे, गजानन काळपांडे ,संतोष राठी, समाधान वानरे , समाधान पिंजरकर, अमोल ढगे, गणेश धर्मे, रोशन अंबळकर, सुनील रंदळी , अनिल काळपांडे, हर्षल धुर्डे , सुचिताबाई धर्मे, उषाबाई काळपांडे, सुनीताबाई राऊत, प्रमिला धुरडे, संगीता काळपांडे, सुरज धरमे, पुष्पा धर्मे, लिलाबाई धुरडे, गणेश बोडखे सह अनेक नागरिक उपस्थित होते.
