गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

प्रशीक संस्थेमार्फत गेल्या चार वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांना ₹ 10000/- शैक्षणिक मदत करण्यात येत आहे. यावर्षी एकूण 72 विद्यार्थ्यांना ₹7,20 हजार रुपयाची मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमात प्रशीक संस्थेचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. कार्याध्यक्ष निवृत उपजिल्हाधिकारी बीडी जाधव, सरचिटणीस (निवृत उपजिल्हाधिकारी) आर एन गरुड, खजिनदार निवृत उपजिल्हाधिकारी पीडी निकुंभ, उपाध्यक्ष निवृत उपजिल्हाधिकारी यशवंतराव भालेराव, सदस्य जेएस शिरसाठ निवृत तहसीलदार, बंडू गायकवाड सदस्य ,निवृत तहसीलदार, विजय थुले, सहसचिव निवृत तहसीलदार, सदस्य उपजिल्हाधिकारी सुधाकर जाधव ,मंत्रालयीन उपसचिव बीएस तायडे, बँक अधिकारी एसबी गायकवाड, जेष्ठ सदस्य एसडी मोरे (उपजिल्हाधिकारी) एड‌ रमेश लभाणे ,प्रभाकर महाले उबाळे साहेब, बाळू ढोके,आणि प्रशीक चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत गायकवाड , वाशीमचे माजी अतिरिक्त

जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितीत असलेल्या सर्वांना 22 प्रतिज्ञा दिल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे छानपैकी सुत्रसंचालन उपाध्यक्ष अशोक दुधसागरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *