शेलगाव मार्गावरील धोकादायक पुलांमुळे नागरिक व विद्यार्थी हैराण

शेलगाव मार्गावरील धोकादायक पुलांमुळे नागरिक व विद्यार्थी हैराण

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

​शिरपूर ते शेलगाव इंगोले आणि शेलगाव बगाडे यांना जोडणारे दोन्ही पूल सध्या अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झाले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचा जीव धोक्यात आला आहे. या समस्येवर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाशिम जिल्हाध्यक्ष महादेव एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुरुस्तीची मागणी केली आहे. कारण ​पुलांची दुरवस्था झाल्यामुळे शाळेत ये-जा करताना लहान मुलांना प्रचंड त्रास होत आहे.​ कमकुवत पुलांमुळे या मार्गावर केव्हाही मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ​ पूल खचल्याने दोन्ही शेलगावच्या नागरिकांचा संपर्क तुटण्याची वेळ आली असून, रुग्ण व वृद्धांचे हाल होत आहेत.​”प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता या दोन्ही पुलांची तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी महादेव एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *