घोषित केल्या नुसार 31,000/- रु चे बक्षीस पोहचविले

प्रवीण रंदळे सरांकडून 11,111 रु. बक्षीस नेहमीच असेल

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवाई

जामोद येथील ग्रामपंचायत अभ्यासिकेत अभ्यास करून नेव्ही SSR मध्ये निवड झालेल्या रोहन गणेश वानेरे या विद्यार्थ्याला प्रवीण रंदळे सर यांनी घोषित केल्या नुसार 31,000/- रु चे बक्षीस पोहचविले आहे.तसेच त्यांनी घोषित केले की यापुढे पण आपल्या जामोद गावातील ग्रामपंचायत अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या वाढावी म्हणून, जामोद ग्रामपंचायत अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी*कुठल्याही सरकारी नोकरी ला लागणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवीण रंदळे सरांकडून 11,111 रु. बक्षीस नेहमीच असेल**MPSC क्लास 1 किंवा SSC CGL ला लागलेल्या विद्यार्थ्याला प्रवीण रंदळे सरांकडून एक्कावन हजार एकशे अकरा रुपये

(51,111).**UPSE परीक्षा पात्र विद्यार्थ्याला प्रवीण रंदळे सरांकडून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस राहील (१,११,१११/-).**JEE / Neet Exam देऊन जर विद्यार्थी IIT or AIMS ला लागल्यास त्याची पूर्ण 4/5 वर्ष कॉलेज ची fees प्रवीण रंदळे कडून भरल्या जाईल.**अट* – *जामोद अभ्यासिकेत अभ्यास करणारा विद्यार्थी असावा फक्त.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *