
नगरसेवक सय्यद नफिस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…समाजवादी पार्टीच्या कार्यकारिणी बरखास्तीनंतरही ‘जिल्हाध्यक्ष’ म्हणून वावर?
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकारिणी फेब्रुवारी २०२६ मध्ये बरखास्त करण्यात आल्याचा दावा केला जात असताना, बुलढाणा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच जळगाव जामोद नगरपालिकेचे नगरसेवक सय्यद नफिस हे आजही विविध कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये स्वतःचा उल्लेख “जिल्हाध्यक्ष” म्हणून करत असल्याचा आरोप पुढे आला आहे… या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत….तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, राज्य कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर त्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आपोआप पदमुक्त झाले आहेत… त्यामुळे कोणत्याही माजी पदाधिकाऱ्याने पूर्वीच्या पदाचा वापर करणे, स्वतःची ओळख त्या पदावरून करून देणे किंवा पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीच्या भूमिकेत कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे….स्थानिक स्तरावर या प्रकरणाची चर्चा रंगली असून, समाजवादी पक्षाच्या अधिकृत संघटनात्मक स्थितीबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचाही आरोप केला जात आहे…. विविध आंदोलने, निवेदने आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये संबंधित नगरसेवक “जिल्हाध्यक्ष” म्हणून सहभागी होत असल्याचे सांगितले जात आहे…याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, संबंधित व्यक्ती सध्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत की नाही, तसेच कार्यकारिणी बरखास्तीनंतर अशा पदाचा वापर करण्यास पक्षाची मान्यता आहे का, याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी होत आहे….दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात नगरसेवक सय्यद नफिस यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही….
