जन्म-मृत्यू दाखला विभागात नागरिकांशी दुर्व्यवहार होत असल्याची चर्चा

जळगाव जामोद नगर परिषदेत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मनमानी? जन्म-मृत्यू दाखला विभागात नागरिकांशी दुर्व्यवहार होत असल्याची चर्चा

जळगाव जामोद | प्रतिनिधी

जळगाव जामोद नगर परिषदेत जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, जन्म-मृत्यू दाखला विभागात अग्निशमन विभागाशी संबंधित काही कर्मचारी बसून कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दाखल्यांसाठी येणाऱ्या लोकांशी अरेरावीची भाषा वापरणे, उडवाउडवीची उत्तरे देणे तसेच अनावश्यक प्रतीक्षा करायला लावणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.जन्म-मृत्यू दाखला विभागात संबंधित अधिकृत कर्मचारीच कामकाज पाहावे आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.दरम्यान, या आरोपांबाबत नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नागरिकांना सन्मानपूर्वक सेवा मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *