देवधाबा येथे शिवरायांच्या पुतळ्याबाबत समन्वयाचा आदर्शग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान

देवधाबा येथे शिवरायांच्या पुतळ्याबाबत समन्वयाचा आदर्शग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान राखत कायदेशीर मार्गावर शिक्कामोर्तब

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये समन्वयातून सर्वमान्य तोडगा निघाला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पीयुष जगताप व शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान पुतळा जागेवरच ठेवत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करण्याचा निर्णय ३० जून रोजी घेण्यात आला.मध्यरात्रीच्या सुमारास गावाच्या प्रवेशद्वारावरील चौफुल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आल्याची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पीयुष जगताप, मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश महल्ले, दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीसनिरीक्षक दीपक वारे तसेच मलकापूर शहरपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या भावना आणि भूमिका जाणून घेण्यात आल्या. प्रशासनाने कोणतीही घाईची भूमिका न घेता शांततेच्या वातावरणात संवादाला प्राधान्य दिले.यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पीयुष जगताप आणि शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान ग्रामस्थांच्या भावना आणि कायदेशीर प्रक्रिया या दोन्ही बाबींचा समतोल राखणाऱ्या विविध पर्यायांवर सकारात्मक विचारविनिमय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या जनभावनेचा सन्मान अबाधित ठेवत शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन व्हावे, यावर उभयतांचे एकमत झाले. या विधायक संवादातून संबंधित पुतळा हटविण्याऐवजी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचामार्ग स्वीकारण्यात आला. त्याअनुषंगाने ग्रामपंचायतीचा ठराव घेणे, शासनाच्या नियमानुसार आवश्यक प्रशासकीय मान्यता प्राप्त करणे तसेच पुतळ्याच्या देखभाल, संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी अधिकृत देखरेख समिती स्थापन करण्याची दिशा निश्चित करण्यात आली. पुतळा जागेवरच कायम राहील आणि त्यासंदर्भातील पुढील सर्व कार्यवाही शासनाच्या प्रचलित नियमांनुसार करण्यात येईल, असा सर्वमान्य निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना अबाधित राहिल्या, तसेच कायद्याच्या चौकटीचे पालनही सुनिश्चित झाले.या संपूर्ण प्रक्रियेत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जगताप यांनी अत्यंत संयमी, समंजस व लोकाभिमुख भूमिका घेत प्रत्येकाची बाजू शांतपणे ऐकून घेतली. त्याचप्रमाणे शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी संवाद आणि समन्वयाला प्राधान्य देत ग्रामस्थांच्या भावना प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या. दोघांमधीलसकारात्मक चर्चेमुळे कोणताही तणाव निर्माणा न होता सर्वमान्य तोडगा निघाला. प्रशासनाच्या आवाहनाला ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसादा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका घेतली. परिणामी कोणताही अनुचिता प्रकार किंवा वाद निर्माण न होता संपूर्ण परिस्थिती शांततेत हाताळण्यात यश आले. संवाद, परस्पर विश्वास आणि कायदेशीर प्रक्रियेचा स्वीकार यांच्याद्वारे संवेदनशीला प्रश्नही सौहार्दपूर्ण वातावरणात सोडविता येतात, याचे देवधाबा येथील हे उदाहरणा अनुकरणीय ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असलेल्या जनभावनेचा सन्मान राखत कायद्याच्या चौकटीत पुढील कार्यवाही करण्याचा स्वीकार झाल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *