
अमानी येथे श्री क्षेत्र रांजदा ते पंढरपूर पायदळ दिंडी चे स्वागतगजानन तायडे यांनी केले फराळ व चहा पाण्याची व्यवस्था
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
श्री करुणेश्वर भगवान कृपा आशीर्वादीत श्री क्षेत्र राजंदा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडी सोहळा चे अमानी येथे भव्य स्वागत करण्यात आले असून येथील संत मुंगसाजी महाराज संस्थान जवळ पंढरपूर कडे जाणाऱ्या या पायदळ दिंडी सोहळ्याचे आगमन होताच गावातील व्यापारी गजाननराव तायडे व त्यांच्या परिवाराकडून दिंडी सोहळ्याची पूजा आरती करून दिंडी चालक दिनकरराव कराळे गुरुजी यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागतही करण्यात आले तसेच, कराळे गुरुजींनी देखील गजाननराव तायडे यांचे रुमाल व टोपी घालून स्वागत केले, दिंडी सोहळ्या मधील महिला व भाविकांना यावेळी तायडे यांच्याकडून फराळाची व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, दरवर्षी पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंडी सोहळ्याचे व्यवस्था तायडे च्या वतीने करण्यात येत असते, हा दिल्ली सोहळा वाशिम मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आली, दिंडी सोहळ्याच्या यांनी कार्यक्रमाला गजानन तायडे , व तायडे परिवारासह मा जि प स अशोक गवळी, गजाननराव गवळी, अनिल जाधव मा उपसरपंच, प्रताप गवळी, लक्ष्मणराव गवळी, तेजराव गवळी, गोपाल गवळी, गणेश तायडे, रमेश अंभोरे, रमेश माकोडे, पांडुरंग गवळी, यांच्यासह महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते
