जऊळका अमानवाडी रस्त्याची विधानसभेत लक्षवेधी केव्हा लागेल.परिसरातील जनतेची मागणी

जऊळका अमानवाडी रस्त्याची विधानसभेत लक्षवेधी केव्हा लागेल.-परिसरातील जनतेची मागणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील जऊळका अमानवाडी रस्ता रस्ता दुरुस्ती संदर्भात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदार व अधीकार्‍यांच्या चौकशी विधानसभेत लक्षवेधी लावून संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली जात आहे. सदर मागणीची आमदार अमित झनक विधानसभेत प्रश्न उपस्थित करतील काय ॽ असा सवाल सर्वसामान्य जनता उपस्थित करीत असूनतूर्तास पावसाळी अधिवेशन चालू असून रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांनी अधिवेशनात गेल्या सहा वर्षापासून मरण यातनेत असणारा व दोन वर्षापासून दुरुस्ती न करणाऱ्या जऊळका अमानवाडी रस्ता तील कंट्रक्शन ठेकेदार व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यावर कामात दिरंगाई करण्याची लक्षवेधी लावून कारवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिका कडून जोर धरत असून सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मतदार संघातील ज्वलंत प्रश्नावर आमदार अमित झनक लक्षवेधी लावून कारवाईची मागणी करतील काय अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *