ॲंटीकरप्शन विभागाच्या पोलीस निरीक्षक राऊत डोंगरकिन्ही यांची भेट तंटामुक्ती अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक

ॲंटीकरप्शन विभागाच्या पोलीस निरीक्षक राऊत डोंगरकिन्ही यांची भेट तंटामुक्ती अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक

​वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील डोंगरकिन्हि येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सेवाराम आडे यांच्या निवासस्थानी वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करप्शन) पोलीस निरीक्षक सुलभा राऊत यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
तंटामुक्ती अध्यक्ष सेवाराम आडे यांचे व्यक्तिमत्त्व मालेगाव तालुक्यात अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांनी गावातील अनेक गुंतागुंतीच्या समस्या आणि वाद गावातच सामोपचाराने मिटवून आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत ही भेट घेण्यात आली.
​यावेळी पोलीस निरीक्षक सुलभा राऊत यांच्यासोबत अँटी करप्शन विभागाचे आशिष शेख, समाधान मोगाड आणि वाहनचालक देवते प्रामुख्याने उपस्थित होते. डोंगरकिन्हि येथे आयोजित या विशेष बैठकीत गावकऱ्यांशी संवाद साधताना सुलभा राऊत म्हणाल्या, “समाजातील गोरगरीब आणि वंचित घटकांवर होणारा अन्याय व अत्याचार पूर्णपणे बंद झाला पाहिजे. जेव्हा केव्हा कोणावरही अन्याय होईल, तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.”डोंगरकिनी तंटामुक्ती अध्यक्ष व कुटुंबीयाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुलभाताई राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य भागुबाई आडे, तंटामुक्ती अध्यक्ष सेवाराम आडे, अजय आडे आणि अक्षय आडे यांनी राऊत यांना सन्मानित करत त्यांचा सत्कार केला. या भेटीमुळे डोंगरकिन्हि व परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *