माहिती अधिकार अधिनियम २०२६ रद्द करण्यासाठी वाशिमात निवेदन

माहिती अधिकार अधिनियम २०२६ रद्द करण्यासाठी वाशिमात निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांचे निवेदन सादर

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

माहिती अधिकार अधिनियम २०२६ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी वाशिम येथे जिल्हाधिकारी व मालेगाव येथे तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासनाकडून माहिती मिळविण्याचा अधिकार अधिक प्रभावी राहावा आणि जनहिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींना बाधा येऊ नये, या उद्देशाने संबंधित मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.कार्यकर्त्यांनी शासनाचे लक्ष या विषयाकडेवेधत अधिनियम रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. नागरिकांच्या अधिकारांशी संबंधित प्रश्नांवर शासनाने व्यापक चर्चा करून योग्य तो निर्णयघ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.निवेदन सादर करताना मालेगाव तालुक्यातील माणिक डोंगरे जिल्हा संघटक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ वाशिम,अतुल इंगोले,कवि राठोड,विशाल टाले, अनिल जाधव,मिलींद खरात महादेव वानखेडे, यशवंत जाधव,शरद सोनोने, विनोद वैद्य,सह तालुका प्रचार प्रमुख तथा माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी माहिती अधिकाराशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.सदर निवेदनाची प्रत संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून मागणीबाबत शासन स्तरावर विचार व्हावा,अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *