तरुणाच्या डोक्यात जड हत्याराने वार करून खून

तरुणाच्या डोक्यात जड हत्याराने वार करून खून.

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पिपरी सरहद्द जवळील बळीराजा पेट्रोल पंपा जवळ चार जणांनी संगनमत करून एका २४ वर्षे तरुणांच्या डोक्यात मागून जड हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना दिनांक १८ जून रोजी घडली आहे याबाबतची तक्रार मृतक अभिषेक विष्णू वाघ यांचे वडील विष्णू गोविंदा वाघ यांनी दि,२१जून रोजी शिरपूर स्टेशन ला दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, यातील आरोपी आनंद विनोद मवाळ यांचे वडील विनोद मवाळ यांच्या सोबत मागील तीन वर्षांपूर्वी पैशाचे कारणावरून वाद झाला होता. तसेच मागील एक महिन्यापूर्वी आरोपी आनंद मवाळ याने मला तू माझी गाडीवर ये असे म्हणायचा परंतु माझा मुलगा अभिषेक याने आम्ही गाडी घेतली असून तुमच्या गाडीवर येऊ शकत नाही‌, असे म्हटले होते तेव्हा आरोपी आनंद मावळ याने तू जर आमच्या गाडीवर आला नाही तर आमच्या एवढे वाईट नाही, अशी धमकी दिली होती त्याचा राग मनात धरून आरोपी आनंद व त्याच्या चार मित्रांनी दि, १८ जून रोजी रात्री सात वाजता माझ्या मुलास बाहेर जेवण्या करिता जाऊ असे सांगून ग्राम पिपरी सरहद येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ नेऊन संगणमत करून जुन्या वादाची कारणावरून कोणत्या तरी जड हत्यारांनी त्याचे डोक्यात गंभीर इजा केली त्याला आम्ही त्वरित सिग्मा हॉस्पिटल व घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे भरती केले होते मात्र उपचार दरम्यान त्याचा दवाखान्यात मृत्यू झाला. त्यामुळे मी दि, २१ रोजी शिरपूर पोलीस स्टेशन तक्रार दिली त्यामध्ये माझ्या मुलास आरोपी आनंद मवाळ वय २३ वर्ष प्रतीक संतोष हुंबळ वय २३वर्ष पवन गजानन दांदडे वय २३ वर्ष सर्व राहणार महागाव व शुभम शेषराव अवचार व २१वर्ष राहणार अंजनी बुद्रुक यांनी संगणक करून त्याला जीवाने ठार मारले आहे. अशा तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी चारही आरोपी विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळाला सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी भेट दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इमरान खान पठाण हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *